• RTO Office Louiswsdi Thane
    RTO Office Louiswsdi Thane
  • RTO Office Louiswsdi Thane
    RTO Office Louiswsdi Thane
  • Mira Bhayander Court Building
    Mira Bhayander Court Building
  • Mira Bhayander Judges Quarters
    Mira Bhayander Judges Quarters
  • ITI Wagle Estate Thane
    ITI Wagle Estate Thane

सार्वजनिक बांधकाम विभाग, ठाणे

मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असून ठाणे जिल्हा या नगरीशी जोडून असल्यामुळे भौगोलिकदृष्ट्या त्यास अनन्य साधारण महत्व आहे. अशा प्रगत नगरीत महाराष्ट्र राज्यात ठाणे जिल्ह्याचे स्थान हे साधारणताः वायव्य दिशेस असून ठाणे जिल्ह्याच्या पूर्वेस नाशिक व अहमदनगर जिल्हे आहेत. दक्षिणेस पुणे जिल्हा आहे. नेऋत्येस मुंबई उपनगर जिल्हा आहे. पच्छीमेस अरबी समुद्र आहे. तर जिल्ह्याच्या उत्तरेस गुजरात राज्य व दादर नगर हवेली हे केंद्र शासीत प्रदेश आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात, ठाणे सा. बा. मंडळ, ठाणे, स्टेशन रोड, ठाणे (पच्छिम) - ४०० ६०१ या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील महत्वाच्या प्रशासकीय इमारतीत सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १ ठाणे कार्यालय कार्यरत आहे. या कार्यालयाचे कार्यकक्षेत ठाणे, भिवंडी व कल्याण तालुक्यातील शाशकीय इमारती, रस्ते व पुल यांची नविन बांधकामे करणे तसेच देखबाल दुरुस्ती करणे ही कामे आहेत.

ठाणे हे अतिशय जुने शहर असून या शहराचा उल्लेख मध्ययुगीन काळातील शिलालेखात आणि ताम्रपटात सापडतात. ठाणे हे मुंबई च्या उत्तरेस १४७ चौ . किमी . क्षेत्रफळात वसलेले आहे. भारतातील पहिली रेल्वे बोरीबंदर ( आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनल्स ) मुंबई ते ठाणे दरम्यान धावली. ठाणे शहरातील कोपनेश्वर मंदिरात दर सोमवारी व नवरात्रीला मोठी वर्दळ असते. तसेच मासुंदा तलाव, येऊर हे आकर्षक ठिकाणे आहेत.

कल्याण शहर हे उल्हास नदीजवळ ३३१. २० चौ . किमी. क्षेत्रफळात वसलेले आहे. या शहराला ठाणे खाडी व वसई खाडीद्वारे अरबी समुद्राशी जोडले गेले आहे. कल्याण शहर मुंबई शहराच्या ४८ किमी ईशान्येला आहे. मुंबईत वाढणारी प्रचंड गर्दी तसेच शासनाचे अनुकूल धोरण या सर्व घटनांमुळे औद्योगिक क्षेत्र उद्योजक कल्याण शहराकडे प्रचंड आकर्षित होत आहे. कल्याण शहरातील काळा तलाव, गणेश मंदिर, विठ्ठल मंदिर - टिटवाळा, दुर्गाडी किल्ला हे आकर्षक ठिकाणे आहेत.

भिवंडी शहर हातमाग व्यवसायासाठी प्रसिद्ध शहर म्हणून ओळखले जाते. शहरातील जास्तीत जास्त लोक हातमाग व्यवसायात कार्यरत आहेत. भिवंडी शहर मुंबईपासून २० किमी अंतरावर ईशान्य दिशेस व ठाणे शहराच्या ईशान्य दिशेस १५ किमी अंतरावर ७२८.२८ चौ . किमी. क्षेत्रफळात वसलेले आहे.